मंदाताई सोबत आमची ओळख ज्योत्स्नाताई ओगले यांच्यामुळे झाली. प्रत्यक्ष भेट होण्याआधीच ज्योत्स्नाताई कडून मंदाताईबद्दल खूप ऐकलं होतं. त्या टोरंटोच्या मराठी मंडळातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती, त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांचा प्रचंड जनसंग्रह आणि त्यांनी कित्येक कुटुंबांना केलेली मदत इत्यादी.
सिद्धार्थ ला भेटायला मंदाताई जेव्हा घरी आल्या ती एक अविस्मरणीय आठवण आहे. पहिल्याच भेटीत मंदा ताईंनी आम्हाला आपलंसं करून घेतलं. आमच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. मंदाताई कडून टोरंटो आणि इथल्या मराठी मंडळीं विषयी माहिती आणि किस्से ऐकताना तीन-चार तास कसे निघून गेले कळलंच नाही. आम्हाला खूप दुःख होतंय की की मंदा ताईंचा सहवास इथून पुढे लाभणार नाही पण निश्चितच त्यांचा आशीर्वाद सिद्धार्थला आणि आम्हाला आयुष्यभर पुरेल.
मंदाताईंना हृदयपुर्वक श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचं बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!