Posted On January 11, 2023
महाराष्ट्र फौंडेशन ( अमेरिका ) यांच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे 4 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेत निधन झाले. त्यांना आदरांजली अर्पण करणारी सभा साधना ट्रस्ट व मासुम यांनी 6 जानेवारी 2023 रोजी, पुणे येथील एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशन च्या सभागृहात आयोजित केली होती.
गजानन खातू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत डॉ सुरेश तलाठी, मुकुंद टाकसाळे, मनीषा गुप्ते, अतुल पेठे, राजेंद्र बहाळकर , डॉक्टर अनंत फडके , हर्षा पुरंदरे , सुनीती सु. र. श्रीपाल ललवाणी, दत्ता बाळ सराफ,श्रुती तांबे,सुरेंद्र जोंधळे,अमित वाडेकर,नंदिनी जाधव, अन्वर राजन, वर्षा गुप्ते, गोपाळ नेवे, कुमार केतकर यांनी प्रत्येकी पाच ते सात मिनिटांत आदरांजली अर्पण केली. सभेचे संचलन साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले.